भयंकर! पोलिओऐवजी १२ चिमुकल्यांना सॅनिटायझर पाजलं, आरोग्यमंत्र्यांनी उचललं 'हे' पाऊल

यवतमाळमध्ये १२ चिमुकल्यांना पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायजर पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी गंभीर दखल घेतली आहे.

यवतमाळमध्ये पोलिओऐवजी सॅनिटायझर दिल्याची ही अक्षम्य चूक‌ आहे. संबंधित अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात आली आहे. त्याविषयीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्र्यांनी घटनेची गंभीर दखल घेत तिथल्या जिल्हा परिषदेच्या सीईओंना दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात आली आहे.

यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी इथं पोलिओ लसीकरणावेळी हा प्रकार घडला. लहान मुलांना पोलिओच्या डोसऐवजी सॅनिटायजर पाजले. १२ लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. वय वर्ष ते पाच वयोगटातील ही लहान मुलं आहेत.

दरम्यान, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी मंगळावारी उपचार घेणाऱ्या चिमुकल्यांची भेट घेतलीय. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणाहीची गय केली जाणार नाही, असं यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कालिंदा पवार यांनी सांगितलं.

लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण व्हायला आणखी काही दिवस जाऊ द्यावे लागतील. कारण पहिल्या फेजमध्ये ८ लाख लोकांचं लसीकरण होणं अपेक्षित होतं. दुसऱ्या टप्प्याच्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्याचं काम जलदगतीनं सुरू आहे. या कक्षेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपली नावं नोंदवावीत, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.


हेही वाचा

गतवर्षी मुंबईतील डेंग्यूचं प्रमाण कमी

३६ हजार कर्मचाऱ्यांना लस; आतापर्यंत १ लाख २५ हजार कर्मचाऱ्यांनी केली नोंदणी

पुढील बातमी
इतर बातम्या