राज्यभर नर्सचे आजपासून काम बंद, रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता

खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी आणि इतर मागण्यासाठी परिचारिका संघटनेच्या वतीने 23 मे ते 25 मे पर्यंत राज्यव्यापी आंदोलन केले आहे. बाह्य स्त्रोताद्वारे (कंत्राटी) पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने तीव्र विरोध केला आहे.

23 ते 25 मे पर्यंत राज्यात सर्व प्रशासकीय जिल्ह्यातील रुग्णालयात 1 तास काम बंद आंदोलन आणि निदर्शने करायला सुरुवात झाली होती. मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे 26 आणि 27 मे रोजी परिचारिका काम बंद आंदोलन करणार आहेत. त्यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

राज्यातील तब्बल 20 हजार नर्सेसनी (Nurse Protest) आंदोलन पुकारंय. तब्बल 20 हजार नर्स आजपासून कामबंद आंदोलन करत आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णसेवा कोलडण्याची भीती आहे. सोमवारपासून आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचा इशारा नर्स संघटनेकडून देण्यात आला होता.

नर्ससाठीची अनेक पदं रिक्त आहेत. ही पदं न भरल्याकारणानं सध्या सेवेत असलेल्या नर्सवर अतिरीक्त ताण पडत असल्यानं नर्सेसमध्ये नाराजी आहे. तातडीनं रिक्त पदं भरुन नर्सेसवर पडत असलेला ताण दूर करावा, अशी मागणी नर्स संघटनेकडून केली जाते आहे.

सध्याच्या घडीला फक्त 30 टक्के नर्स रुग्णसेवा देत आहेत. सरकारी मेडिकल कॉलेज आणि जिल्हा सामान्य रुग्णालयांसर सरकारी दवाखान्यात असलेल्या नर्सची संख्या तुटपुंजी असल्याचं नर्सेसचं म्हणणंय. रिक्त असलेली 70 टक्के पदं तातडीनं भरली जावीत, अशी मागणी नर्स संघटनेकडून केली जाते आहे.


हेही वाचा

पालिका मुंबईतील 'ही' ३ कोविड सेंटर करणार बंद

मंकीपॉक्ससाठी पालिकेची तयारी, रुग्णांसाठी उभारला स्वतंत्र वॉर्ड

पुढील बातमी
इतर बातम्या