गोवरपासून मुलांचे संरक्षण कसे करावे? लक्षणे आणि खबरदारी जाणून घ्या

मीझल्स हा अत्यंत संक्रामक व्हायरल इन्फेक्शन आहे. एक संक्रमित व्यक्ती या विषाणूचा त्याच्या जवळील  किंवा संपर्कातील दहा पैकी दहा जणांना संक्रमण करतो. श्वसन, खोकला किंवा शिंक या वाटे याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यानंतर, वातावरणात सुमारे दोन तास विषाणू सक्रिय राहू शकतो.

मीझल्स (गोवर) म्हणजे काय?

गोवर हा एक विषाणूपासून पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. जो लहान मुलांना अधिक होतो. एकदा गोवर होऊन गेल्यास तो पुन्हा होण्याची शक्यता फार कमी असेते. गोवर हा Paramyxovirus या व्हायरसमुळे पसरतो. 10 ते 12 दिवसात गोवरची लक्षणे जाणवू लागतात. खोकल्याने किंवा शिंकल्याने तो पसरु शकतो.

बाळांना जन्मानंतर नवव्या महिन्यात गोवरची लस दिली जाते. त्यानंतर दुसरा डोस दीड ते दोन वर्षात दिली जाते.

गोवरची लक्षणे काय?

  • खोकला, ताप, सर्दी होणे,
  • डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे
  • घशात दुखणे
  • तोंडात पांढरे स्पॉट येणे
  • ‎अशक्तपणा
  • अंग दुखी
  • चेहऱ्यावर, पोटावर आणि पाठीवर लाल पुरळ उठतात.

गोवर झाल्यास काय काळजी घ्याल?

  • मीझल्स मध्ये विशिष्ट उपचार नाही आहे. हा आजार अंदाजे 7-10 दिवसातच कमी होतो. खसराची लक्षणे म्हणजे म्हणजे लक्षणोपचार चिकित्सेतून औषधोपचार करणे.
  • संक्रमित झालेल्या लोकांना घराच्या आत राहण्याचा सल्ला दिला जातो.
  • कमीतकमी चार ते पाच दिवस सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून परावृत्त करण्याची शिफारस केली जाते.
  • मुलांमध्ये आणि गर्भवती महिलांना याचा अधिक धोका असून शकतो. त्यामुळे त्यांनी जास्त घबरदारी घेणे आवश्यक आहे.
  • पॅरासिटामोल किंवा आयबूप्रोफेन या गोळ्या डॉक्टर देतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्या गोळ्या घेऊ नयेत.
  • हायड्रेशन होऊ नये म्हणून भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. तसंच योग्य आहारही घेणे गरजेचे आहे.
  • जेवण आणि पाणी गरम प्यावे. जेणेकरून खोकल्याने त्रास होत असेल तर घश्याला आराम मिळेल.
  • गोवरमध्ये डोळ्यातून पाणी येणे, डोळे दुखणे असा त्रास उद्भवतो. त्यामुळे डोळे स्वच्छ ठेवावेत. ओल्या रुमालाने डोळे पुसून घ्यावेत.
  • जर श्वास घ्यायला त्रास, खोकल्यातून रक्त पडणे, फिट येणे अशी गंभीर लक्षणे दिसत असतील तर त्वरीत रुग्णालयात दाखल करा.


हेही वाचा

मुंबईवर नव्या आजाराचे संकट, गोवंडीत तीन मुलांचा मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या