मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. मुंबईतील रुग्णांचा आकडा आता ६४ हजारांवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता ३३ दिवसांवर पोहोचला आहे. गुरूवारी हा कालावधी ३ दिवसांवर होता.
एच पूर्वने (वांद्रे पूर्व, खार ) विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून तब्बल ६९ दिवसांवर गेला आहे. तर या विभागात रूग्ण वाढीचा सरासरी दर फक्त १ टक्के इतका सर्वात कमी आहे.
ई (भायखळा) विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी ६१ दिवस रूग्ण वाढीचा सरासरी दर १.१ टक्के आहे. एफ उत्तर (माटुंगा) मध्ये रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६४ दिवस आणि रूग्ण वाढीचा सरासरी दर १.२ टक्के आहे. एम पूर्व (चेंबुर पूर्व) मधील कालावधी ५४ दिवस तर एल (कुर्ला) मधील ५३ दिवस आहे. दोन्ही विभागात रोजची रुग्णवाढ प्रत्येकी १.३ टक्के आहे.
'असे' आहेत मुंबईतील कंटेन्मेंट झोन
मुंबईतील सील केलेल्या इमारतींची 'ही' आहे यादी