मालाडमध्ये ‘आपकॉन आयुर्वेदिक संवाद’

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

मालाड - एस्पी ऑडिटोरीयमध्ये ‘आपकॉन आयुर्वेदिय संवाद 2016’ चे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी असोसिएशन ऑफ आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स या संस्थेच्या वतीने याचे आयोजन केले होते. डॉ. निलेश दोषी आणि डॉ. दिलीप त्रिवेदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात देशभरातून आयुर्वेद क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ.गोपकुमार, डॉ. एल महादेवन, डॉ. मिताली मुखर्जी, डॉ. निगम, डॉ. राजेंद्र राणावत, डॉ. रमेश शर्मा, डॉ. निलेश दोषी आणि डॉ. दिलीप त्रिवेदी या तज्ज्ञ वैद्यांनी आयुर्वेदातील विविध विषयांवर चर्चा केली.

पुढील बातमी
इतर बातम्या