राज्य सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना खासगी रुग्णालयात केलेल्या करोोनावरील उपचारांच्या खर्चाची परतफेड आता मिळणार आहे. तसा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २ सप्टेंबर २०२० पासून हा आदेश लागू होईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. टोपे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.
टोपे यांनी ट्विटरवरुन सांगितलं की, शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी आकस्मित तसेच गंभीर आजारावर खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यांच्यावर होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येते. हा वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोविड-१९ या आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आकस्मिक तसेच गंभीर आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास त्यावर होणाऱ्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती दिली जाते. राज्य शासनाने मार्च २००५ मध्ये जाहीर केलेल्या शासन निर्णयात २७ आकस्मिक आणि ५ गंभीर आजार निश्चित केले आहेत. त्यात हृदय आणि फुफ्फुसाशी निगडित आजारांचा समावेश असला तरी कोरोना उपचाराचा वैद्यकीय खर्चाचा समावेश करण्यात आला आहे.
मिठी नदीच्या साफसफाईसाठी केंद्राकडून एकही दमडी मिळाली नाही, RTI मधून खुलासा
मुंबईच्या गल्लीबोळात राहणार आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर