ICU मधल्या बेड्सची संख्या वाढेल : राजेश टोपे

महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कबूल केलं की, मुंबईला ICU बेड्सची कमतरता आहे. तथापि, सोशल मीडियाद्वारे संबोधित करताना टोपे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिक बेड्स वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या काळात परिस्थिती अधिक सुधारेल.

महाराष्ट्र सरकार कोविड केअर सेंटरमधील बेड्स एक लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. सध्या ही संख्या ६० हजार इतकी आहे. राजेश टोपे म्हणाले की, खासगी रुग्णालयांतील ८० टक्के बेड क्षमता वाढवण्यासाठी घेण्यात येणार आहेत. टोपे यांनी सांगितलं की, ८० टक्के बेड्ससाठी सरकारी दर निश्चित करण्याचीही अधिसूचना जारी केली आहे. उर्वरित २० टक्के खासगी रुग्णालये स्वत:चा दर आकारू शकतात, असं टोपे म्हणाले. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार पालिकेनं म्हटले आहे की, ICU बेड्सची सध्याची संख्या ५३५ पासून १००० पर्यंत वाढवण्यात येईल.

सार्वजनिक क्षेत्रातील बेड्सची संख्या ३ हजार ६५७ नं वाढवून ५ हजार ०३० करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, DCH आणि DCHC साठी ६ हजार १३० बेड्स आहेत. आगामी सुविधा ३१ मे पर्यंत तयार होतील. ज्यामध्ये ऑक्सिजनसह अधिक बेड जोडले जातील.

सोशल मीडियाच्या माध्यमातून भाषण करताना राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात रुग्णांच्या दुप्पटीकरणाचा वेग मंदावला आहे. यापूर्वी ३ दिवसांवरून १४ दिवसांवर रुग्णांच्या दुप्पटीकरणाचा वेग गेला आहे.

महाराष्ट्रात ३७ हजार १३६ COVID 19 रुग्ण आढळलेत. तर मृतांचा आकडा १ हजार ३२५ पर्यंत पोहोचला आहे. एकट्या मुंबईतच कोरोनाव्हायरसचे रुग्ण २२ हजार ७४६ पर्यंत वाढली आहे. शहरात मृतांचा आकडा ८०० च्या घरात गेला आहे.


हेही वाचा

मुलुंडच्या ऑक्टरॉय इमारतीचा COVID 19 केअर सेंटर म्हणून वापर

बीकेसीतील दुसऱ्या कोविड-१९ रुग्णालयाच्या उभारणीला सुरूवात

पुढील बातमी
इतर बातम्या