नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. शुक्रवारी नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. ७४ नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची एकूण संख्या १०४८ झाली आहे. अद्याप ९४८ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.
शुक्रवारी १७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत बरे होणाऱ्यांची संख्या २७२ झाली आहे. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आढळलेल्या ७४ रुग्णांमध्ये बेलापूरमधील दोन, नेरूळमधील १८, वाशीतील चार, तुर्भे येथील १४, कोपरखैरणेतील १९, घणसोलीतील १३, ऐरोलीतील दोन, दिघा येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.
नवी मुंबईत कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या ७८४४ झाली असून त्यापैकी पॉझिटिव्ह १०४८, तर निगेटिव्ह ५८४८ रुग्ण आढळून आले आहेत. ९४८ रुग्णांचा तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
हेही वाचा -
लाॅकडाऊनचा चौथा टप्पा कसा? मुख्यमंत्र्यांची शरद पवारांशी चर्चा
मुंबईत ३१ मेपर्यंत कोरोनाग्रस्तांसाठी आणखी ३१०० बेड्स