कामगार वाढवण्याचा प्रस्ताव धूळ खात

  • रोहित पोखरकर & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

नागपाडा - पालिकेच्या प्रभागांमध्ये धूर आणि औषध फवारणी करणारे कामगार आणि मशीन वाढवण्यासाठी देण्यात आलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. कामगारांची संख्या कमी असल्यानं आहे,त्यांच्यावर ताण पडून आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

डास प्रतिबंधक धूरफवारणीसाठी पालिका प्रशासनानं 'एक नगरसेवक एक मशीन' असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व 227 प्रभागांमध्ये औषध फवारणी व्यवस्थित होत नसल्याचा आरोप होत आहे. त्यावर उपाय म्हणून बी विभाग आणि अन्य विभाग अधिकाऱ्यांनी महापालिकेकडे औषध फवारणी करणारे कामगार आणि मशीन वाढवावे या संबंधीचा प्रस्ताव 2 महिन्यांपूर्वीच दिला होता. पण हा प्रस्ताव धूळ खात पडला आहे.

याबाबत कीटकनाशक फवारणी विभागप्रमुख नितीन ढोबे म्हणाले, ' विभागाकडे मशीन आणि कामगारांची टंचाई अाहे. पण महानगरपालिका आयुक्त या मुद्द्यावर लवकरच ठोस निर्णय घेतील. सद्यस्थितीत बी विभागात जेवढ्या इमारती आणि गटारे आहेत. त्यामध्ये नियमित औषध फवारणी केली जाते.' पण  स्थानिक नागरिकांनी मात्र 20 ते 25 दिवसांतून एकदा औषध फवारणी होत असल्याची माहिती दिलीय.  औषध फवारणीत नियमितपणा आणण्यासाठी कामगार आणि मशीनसुद्धा वाढायला हव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

इतर बातम्या