मुंबईत लेप्टोचा दुसरा बळी

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • आरोग्य

मुंबईत पावसाला सुरुवात होते न होते तोच जीवघेण्या आजाराने मुंबईकरांना टिपायला सुरुवात केली आहे. मंगळवारी सायन रुग्णालयात एका १५ वर्षांच्या मुलाचा बळी घेतल्यानंतर लेप्टोने बुधवारी २८ वर्षांच्या तरुणाचा जीव घेतला. मुंबईतला हा लेप्टोचा सलग दुसरा बळी आहे.

आणि तरुणाचा मृत्यू

इम्तियाज अली असं या तरुणाचं नाव आहे. इम्तियाजला २३ जानेवारी रोजी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याला लेप्टो असल्याचं स्पष्ट झालं. उपचारांदरम्यान इम्तियाजची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला आयसीयूत हलवण्यात आलं. परंतु त्याच्या शरीराने उपचारांना साथ न दिल्याने इम्तियाजचा बुधवारी दुर्दैवी मृत्यू झाला.

लेप्टोचा दुसरा बळी

यंदाच्या पावसाळ्यात सायन रुग्णालयात गेलेला लेप्टोचा हा दुसरा बळी. याआधी मंगळवारी कुर्ल्यात राहणाऱ्या प्राचील कांबळे या १५ वर्षांच्या मुलाचा लेप्टोने मृत्यू झाला होता.

या घटनेने मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुर्ला आणि परिसरात धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या