आरोग्यक्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

विलेपार्ले - आरोग्य चांगले तरंच जिवन सफल बनते. याच आरोग्यनिगा क्षेत्रातील अतुलनिय कामगिरीसाठी विविध शाखांतील दिग्गज व्यक्तींना राष्ट्रीय मौखिक आरोग्यनिगा सुश्रुत पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. हा सोहळा ४ नोव्हेंबर रोजी विलेपार्ले पूर्व येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. या वेळी केंद्रिय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते दिग्गजांना पुरस्कार देण्यात येणार आहे. लोककल्याणकारी संस्था आयडिए फाउंडेशन तर्फे हा सोहळा आयोजित केला असुन ह्या माध्यमातुन इतर व्यावसायिकांना अधिक उंचीवर जाण्यास आणि अधिक सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरणा मिळेल, असं आयडिएचे सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे म्हणालेत.

पुढील बातमी
इतर बातम्या