केईएम रुग्णालयात डायलिसिस विभागात फाॅल सिलिंग कोसळलं, २ जखमी

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • आरोग्य

परळच्या केईएम रुग्णालयातील डायलिसिस विभागात फाॅल सिलिंग कोसळल्याची घटना बुधवारी रात्री ८.४५ च्या सुमारास घडली. यामध्ये २ रुग्ण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

या घटनेनंतर वॉर्डमधील रुग्णांना तातडीने दुसऱ्या वॉर्डमध्ये स्थलांतरीत करण्यात आलं. शिवाय प्रत्यक्षदर्शी अमित यांनी दिलेल्या माहितीनुसार हे फाॅल सिलिंग रात्री पावणे नऊच्या सुमारास कोसळलं. ज्यात २ जण जखमी झाले आहेत. पण, ही माहिती मिळाल्यावर लगेचच त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आलं.  तर, केईएमचा सिव्हील डिपार्टमेंट खूप अडचणींचा असल्याची प्रतिक्रिया रुग्णालय कर्मचाऱ्याने 'मुंबई लाइव्ह' शी बोलताना दिली आहे.

डायलिसिस सेंटरमधील फाॅल सिलिंग कोसळलंं आहे. यात २ रुग्ण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दुसऱ्या ठिकाणी सध्या सेंटर हलवण्यात आलं आहे. आणि या सेंटरचं काम ३ - ४ दिवसांत होईल.

- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

पुढील बातमी
इतर बातम्या