पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दोघांना कोरोना

आता मुंबई महापालिका मुख्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. विशेष खबरदारी म्हणून पालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष सील करण्यात आला आहे.

आतापर्यंत कोरोनाचे 2 हजार 724 रुग्ण आढळले आहेत. डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षात काम करणाऱ्या दोन जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे. कोणत्याही आपत्ती काळात जलद आणि प्रभावी प्रतिसाद कार्यान्वीत करण्यासाठी निरनिराळया यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम या कक्षाकडे असते.

राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 456 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार 724 वर पोहोचला आहे.


हेही वाचा -

पालघरमध्ये चोर समजून तिघांची दगडानं ठेचून हत्या

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४२०० वर


पुढील बातमी
इतर बातम्या