एमएमआरडीए कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनाची भेट

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा 42 वा वर्धापन दिन गुरूवारी षण्मुखानंद सभागृहात साजरा झाला. या वेळी महानगर आयुक्त यु.पी.एस.मदान यांनी सुट्टीच्या दिवशी कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यात 30 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचं जाहीर करत कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनाची भेट दिली. कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन, भाडेतत्वावरील प्रकल्पात कायमस्वरूपी घरं आणि निवृत्तीनंतरच्या वैद्यकिय सुविधा या मागण्यांसंबंधी प्राधिकरण सकारात्मक असल्याचंही या वेळी मदान यांनी सांगितलं. देवेंद्र पेम लिखित आणि दिग्दर्शित 'ऑल द बेस्ट -2' नाटकाच्या विशेष प्रयोगाचंही या वेळी आयोजन करण्यात आलं होतं.

455 जणांना मेट्रोमुळे रोजगार

4 मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू झाले असून या कामामुळे 455 नवीन पदे निर्माण झाली आहेत. अधिकारी पदापासून शिपायांपर्यंतची ही पदे आहेत. त्यामुळे 455 जणांना मेट्रोमुळे रोजगार मिळाल्याचंही मदान यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या