१२ सिलिंडरच्या स्फोटांनी मिरा रोड हादरले

(Video screen shot)
(Video screen shot)

रविवारी मध्यरात्री झालेल्या एकामागून एक १२ स्फोटांनी मीरारोड परिसर हादरला. सलग झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी परिसरात घबराट निर्माण झाली होती.

मीरारोडमध्ये राम नगर येथील शांती गार्डन, सेक्टर नंबर ५ येथील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सिलेंडरच्या गाडीत रात्री २ वाजल्यानंतर सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आजूबाजूला दोन सिलेंडरने भरलेल्या गाडया होत्या त्या दोन्ही गाड्यांना आग लागली होती. आणि त्यातील भरलेल्या सिलेंडरचे एकामागून एक स्फोट होतं होते. जवळपास १२ स्फोट झाल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे. 

स्फोटानंतर मीरा भाईंदर अग्निशमन दलाच्या सात गाड्या, दोन टँकर आणि ५४ जवान घटनास्थळी दाखल झाले. पहाटे तीनच्या सुमाराला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. स्फोटांची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन दलाच्या गाड्या अर्धा किलोमीटर दूर थांबवण्यात आल्या होत्या. तिथूनच या गाड्यांवर पाणी फवारवण्यात येत होतं.

स्फोट एवढे तीव्र होते की आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या. सिलिंडर भरलेल्या एका गाडीच्या पत्र्याचा तुकडा हा शेजारच्या सोसायटीच्या आवारात येऊन पडला. एका तुकड्याने एक नागरिक जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं.


हेही वाचा -

मंगळवारी व बुधवारी माटुंगा परिसरात पाणीपुरवठा बंद

मुंबईतील 'इतकी' खासगी रुग्णालये धोकादायक


पुढील बातमी
इतर बातम्या