बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एच पश्चिम वॉर्डमध्ये 243 रस्ते खोदले आहेत. ज्यामध्ये वांद्रे, खार रोड आणि सांताक्रूझ पश्चिम यांचा समावेश आहे. या खोदकामामुळे नुकसान झाले आहे आणि ते रहिवाशांसाठी त्रासदायक बनले आहे.
गेल्या आठवड्यात, यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यामध्ये 120हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या रस्ते खोदकामांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
खोदकामांमुळे पथदिवे, पाण्याच्या आणि गॅस पाइपलाइनचे नुकसान झाले आहे. पाणी दूषित झाले आहे. ज्यामुळे डासांची उत्पत्ती होण्याचा धोका वाढला आहे. वाहतूक वळवणे आणि रस्ते बंद केल्याने अडचणी वाढल्या आहेत. तर चालू बांधकामांमुळे होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
नागरिकांनी निदर्शनास आणून दिले की गॅस, वीज आणि पाण्याच्या लाइनचे नुकसान होत आहे. हॉटेल कदंब लेन जवळील लिंकिंग रोडवरील स्ट्रीट लाईट्स काम करणे बंद केले होते आणि 7व्या रोडवरील पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये सांडपाणी पाणी शिरले होते.
शिवाय, खार पश्चिमेकडील सदानंद क्लासिक आणि राम कुटीर जवळील नाल्यांमध्ये सांडपाणी आढळून आले आणि 31 दिवसांपासून ही परिस्थिती मार्गी लावण्यात आली नाही.
अहवालांनुसार, रहिवाशांनी तक्रार केली की बीएमसीचा कोणताही अभियंता परिस्थितीवर लक्ष ठेवत नव्हता आणि कामगार योग्य देखरेखीशिवाय खोदकाम सुरू ठेवत होते, असा आरोपही करण्यात आला आहे.
हेही वाचा