मिठी नदीचा पूर टाळण्यासाठी पालिका माहीम कॉजवे इथं फ्लडगेट्स बांधणार

मिठी नदीमुळे सायन, चुनाभट्टी आणि कुर्ला यासारख्या भागांत झालेल्या पूरानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) माहीम कॉजवेच्या समोरील भागात फ्लडगेट बांधण्याचा विचार करत आहेत.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, या प्रस्तावामागील कल्पना म्हणजे मिठी नदीत समुद्राचे येणारे पाणी अडवणे. विशेषत: समुद्राच्या भरती दरम्यान. जादा पाणी काढून टाकण्यासाठी पंपिंगचीही व्यवस्था केली जाईल. मिथी नदी बोरीवलीच्या विहार तलावापासून सुरू होऊन माहीम कॉजवे जवळील अरबी समुद्रापर्यंत १७.८ किलोमीटरपर्यंत पसरली आहे.

पालिका मिठी नदीच्या काठाजवळ तलाव तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याच्या प्रक्रियेत आहे. यामुळे अधिकाऱ्यांना विहार आणि पवई तलावातील अतिवृष्टीचे पाणी किंवा ओव्हरफ्लोड पाणी साठवण्यात मदत होईल. सल्लागार सेवांसाठी पालिकेसाठी सुमारे ३० कोटी खर्च अपेक्षित आहे.

जल निचरा विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, “सल्लागाराला धरण किंवा फ्लडगेट बांधण्यासाठी योग्य स्थानं सुचवण्यास सांगितलं जाईल. माहीम कॉजवे हे एक स्थान आहे परंतु इतर ठिकाणी व्यवहार्यतेसाठी तपासणी केली जाईल. सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी नियुक्त सल्लागाराला एक वर्ष देण्यात येईल.”

गेल्या १५ वर्षांत मिठी नदीशी संबंधित हा पालिकेचा हा तिसरा प्रकल्प आहे. २००५ मध्ये शहरातील पूरानंतर नागरी संस्थेनं यापूर्वी ‘मिठी नदी विकास प्रकल्प’ हाती घेतला होता. या प्रकल्पात नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरणदेखील झाले. पुढे, २०१५ मध्ये, पालिकेनं नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशानं ‘मिठी नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्प’ सुरू केला होता.

धरणं, पुराचे दरवाजे तयार करून किंवा तलाव धारण करून, अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की ते कुर्ला, चुनाभट्टी आणि सायन यासारख्या प्रदेशातील पूर रोखू शकतात. गेल्या पाच पावसाळ्यात या भागात साचलेल्या पाण्यामुळे रेल्वे सेवेवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. पाण्याची पातळी वाढल्यानं माटुंगा रोड रेल्वे स्थानकाजवळील पश्चिम मार्गावरही परिणाम होतो.


हेही वाचा

मुंबईतल्या 'या' भागांमध्ये पाणी येणार नाही

'या' ५ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर स्पेशल झोन

पुढील बातमी
इतर बातम्या