मुंबईकरांसाठी बंपर लॉटरी

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

मुंबईपासून दूर, निसर्गरम्य वातावरणात एक घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. याचाच विचार करून म्हाडानं मुंबईकरांना एक संधी दिलीय. सेकेंड होमचं स्वप्न ज्या मुंबईकरांना पुर्ण करायचे आहे त्यांच्यासाठी म्हाडानं पुणे-सोलापुरमध्ये सेकेंड होम्स घेण्याची संधी उपलब्ध करून दिलीय. गणेश चर्तुर्थीच्या शुभमुहुर्तावर म्हाडाच्या पुणे मंडळानं 2 हजार 503 घरांसह 67 भुखंडाच्या बंपर लॉटरीची घोषणा केलीय. पुणे आणि सोलापुरमधील घरांसह सोलापुरमधील भुखंडाचा या लॉटरीत समावेश आहे. 7 सप्टेंबरपर्यंत या लॉटरीसाठी अर्ज भरता येणार आहेत. 25 सप्टेंबरला पुण्यातील बालगंर्धव रंगमंदिरात लॉटरी काढण्यात येणार आहे. दरम्यान या लॉटरीत मुंबईकरांना समावून घेण्यासाठी मुंबईतील अॅक्सीस बॅंकेच्या विविध शाखांमध्ये अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या