महावितरण ग्राहक मित्र

  • पूजा भोवड & मुंबई लाइव्ह टीम
  • इन्फ्रा

वांद्रे - राज्यातल्या वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा मिळावी यासाठी महावितरणाकडून मोबाईल अॅपसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी अभय योजना राबवण्याचा विचार आहे. अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिली. वांद्र्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महावितरणकडून तात्काळ वीज जोडणी तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कक्ष तसेच त्यांच्या तक्रारीचा सातत्याने पाठपुरावा घेतला जाईल असेही ते म्हणाले. अोपन अॅक्सेसमुळे महावितरणचे अौद्योगिक ग्राहक महावितरणची वीज घेत नसून त्याचा फटका महावितरणला बसत असल्याची नाराजगीही त्यांवी व्यक्त केली.

पुढील बातमी
इतर बातम्या