म्हाडाचा दिवाळी धमाका; १६ डिसेंबरला फुटणार १३८४ घरांसाठी लॉटरी

येणार येणार म्हणता म्हणता गेल्या सहा महिन्यांपासून हुलकावणी देणाऱ्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. दिवाळीच्या महुर्तावर मुंबई मंडळाने १३८४ घरांसाठीची जाहिरात प्रसिध्द करत इच्छुकांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. 

स्वस्तात घरं

या जाहिरातीनुसार ५ नोव्हेंबरपासून लॉटरीच्या नोंदणी, अर्जविक्री-अर्जस्वीकृती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर १३८४ घरासाठी १६ डिसेंबरला लॉटरी फुटणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे लॉटरीतील घरांच्या किमती नव्या धोरणानुसार कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा मुंबईसारख्या महागड्या ठिकाणी अगदी स्वस्तात घराचं स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

५ कोटी ८० लाखांचं घर

 या लाॅटरीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ६३, अल्प उत्पन्न गटासाठी ९२६, मध्यम उत्पन्न गटासाठी २०१ तर उच्च उत्पन्न गटासाठी १९४ घरं अाहेत. उच्च गटातील एका घराची किंमत तब्बल ५ कोटी ८० लाख रुपये अाहे. हे घर ग्रँट रोड येथील अाहे. 

जाहिरात आणि लॉटरीची पूर्ण माहिती www.lottery.mhada.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध होईल.


हेही वाचा - 

बीडीडीवासीयांची नाराजी म्हाडाकडून दूर, १२५ हून अधिक रहिवाशांचा संक्रमण शिबिरात जाण्यास होकार

म्हाडाच्या सी विभागातील उपअभियंत्याला लाच घेताना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या