म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९०१८ घरांच्या लॉटरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच आता मुंबईकरांसाठी आणखी एक खुशखबर आहे. नवी मुंबईत परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी आता सिडकोने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार कळंबोली, तळोजा, घणसोली, द्रोणागिरी आणि खारघर या परिसरातील १४ हजार ८३८ घरांसाठी २ ऑक्टोबरला ऑनलाईन पध्दतीने लॉटरी फुटणार असल्याची माहिती सिडकोचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.
तब्बल १४ हजार ८३८ घरांची लॉटरीची खूशखबर देतानाच चंद्रा यांनी नव्या २५ हजार घरांची निर्मिती नवी मुंबईत करण्यात येणार असल्याचंही सांगितलं आहे. महत्वाचं म्हणजे २ ऑक्टोबरची लॉटरीतील घरं अाणि नव्यानं बांधण्यात २५ हजार घरं ही गरिबांसाठी अर्थात अत्यल्प आणि अल्प गटासाठीच आहेत. त्यामुळे सिडकोच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गरिबांची गृहस्वप्नपूर्ती होणार आहे हे विशेष.
१४ हजार ८३८ घरांच्या लॉटरीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी सिडकोने स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त शोधला आहे. त्यानुसार १५ ऑगस्टपासून अर्ज नोंदणी आणि अर्ज स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. इच्छुकांना १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. अत्यल्प गटासाठी ५ हजार २८० रुपये इतकी अनामत रक्कम आहे तर अल्प गटासाठी २५ हजार २८० रुपये अशी अनामत रक्कम आहे.
पंतप्रधान आवास योजना
नव्याने सिडकोकडून पंतप्रधान आवास योजनेखाली २५ हजार घरांची निर्मिती करण्यात येणार असून या कामाला डिसेंबर २०१८ मध्ये सुरुवात होणार असल्याचंही चंद्रा यांनी सांगितलं आहे. ही घरंही तळोजा, कळंबोली, द्रोणागिरी, घणसोली आणि खारघर परिसरात असणार आहेत.
अत्यल्प गटासाठीची घरं
हेही वाचा -
म्हाडावर नामुष्की! १९ आॅगस्टची लाॅटरी २५ आॅगस्टवर