बेरोजगारांसाठी खूशखबर, महावितरणमध्ये होणार ७ हजार पदांची मेगा भरती

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी बेरोजगारांसाठी आता एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) मध्ये तब्बल ७ हजार पदांची मेगा भरती होणार आहे. या भरतीत उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यक पदं भरली जाणार आहेत. 

महावितरणने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण ७००० रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्युत सहाय्यक पदाच्या ५००० तर उपकेंद्र सहाय्यकच्या २ हजार जागा भरल्या जाणार आहेत. 

विद्युत सहाय्यक पदासाठी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण आणि आयटीआय (इलेक्ट्रॉन / टेलीग्राफ) किंवा इलेक्ट्रॉन / टेलीग्राफ डिप्लोमा पास असणं आवश्यक आहे. तर उपकेंद्र सहाय्यक पदासाठी 12 वीची परीक्षा उत्तीर्ण आणि आयटीआय (इलेक्ट्रॉन / टेलीग्राफ) किंवा इलेक्ट्रॉन / टेलिग्राफ डिप्लोमा पास, अनुभव - २ वर्षे) ही पात्रता आहे. उमेदवारांसाठी १८ ते २७ वर्षे अशी वयोमर्यादा आहे.

विद्युत सहाय्यक पदामध्ये सर्वसाधारण १६७३, महिला १५००, क्रीडापटू २५०, एक्स सर्व्हिसमॅन ७५०, प्रोजेक्टड २५०, भूकंपग्रस्त ९९, लर्नर उमेदवारांसाठी ५०० जागा असणार आहेत.

भरती प्रक्रिया १८ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू सुरु झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ मार्च २०२१ पर्यंत आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असतील त्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.

इतर बातम्या