भविष्यात मिरा भाईंदर, घोडबंदर व दहिसर एकमेकांना जोडणार

लॉकडाऊनच्या काळात मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) कामांना गती मिळाली आहे. अशातच मिरा-भाईंदर, घोडबंदर व दहिसर एकमेकांना जोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. एमएमआरडीएनं (MMRDA) ३३७ किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्क जाळ्याचं काम वेगानं सुरु केलं आहे. २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करायाचं आहे. त्याशिवाय, मेट्रो ९ (metro 9) दहिसर ते मिरा भाईंदर आणि मेट्रो ७-अ (metro 7) पश्चिम द्रुतगती मार्ग, अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-२ बांधण्याचे काम सुरू आहे.

या कामामुळं पश्चिम उपनगर तसंच, मिरा भाईंदर हे भाग विमानतळाशी जोडले जाणार आहेत. तसंच, मिरा भाईंदर, घोडबंदर व दहिसर हे भाग मेट्रोनं एकमेकांना जोडले जाणार आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गाच्या पश्चिमेस असलेल्या सर्व्हिस रोडवर पांडुरंग वाडी स्थानक बनविण्याचा विचार होता. मात्र, महापालिकेनं जकातीच्या मोकळ्या जागेत प्रवेशद्वाराजवळ आर-नॉर्थ वॉर्डमध्ये विकास करायचे योजले असल्याने हे स्थानक पश्चिम द्रुतगती मार्गाच्या पूर्वेस जकात नाक्याच्या बाजूला होणार आहे.

नवीन स्थानकाच्या बदलामुळे १५० गाळ्यांसाठीचं भूमी अधिग्रहण, आरअँडआरमुळं काम पूर्ण करण्यात होणारा विलंब टाळता येणार आहे. या स्थानकाचा वापर प्रस्तावित असलेल्या मेट्रो-१० साठी टर्मिनस म्हणूनही केला जाऊ शकणार आहे. त्याने गायमुख आणि शिवाजी चौक हे भाग जोडले जातील. अशाप्रकारे मिरा भाईंदर, घोडबंदर व दहिसर हे भाग मेट्रोने एकमेकांना जोडले जाणार आहे.

मेट्रो ९

  • मेट्रो ९ चे संरेखन दिल्ली मेट्रो रेल कॉपोरेशन दिलेल्या डीपीआरच्या आधारे करण्यात आले आहे.
  • हे संरेखन पश्चिम द्रुतगती मार्गाच्या पूर्वेस असलेल्या ओव्हरी पाड्याला तिरपे जाऊन, टोल प्लाझाला मध्य रेषेत येते.
  • कमानीआधी पश्चिममेस जाते. यामध्ये अनेक प्रवेशद्वारांचा समावेश पश्चिम द्रुतगती मार्ग ओलांडण्यासाठी  कमानीतून करण्यात आला आहे.
  • ही कमान एमसीजीएमद्वारे दहिसर चेक नाका येथे बांधण्यात आली.
  • या संरेखनात पश्चिम द्रुतगती मार्गाच्या पश्चिमेस, दहिसर ते पांडुरंग वाडी या दरम्यान दीडशेहून अधिक गाळे बनवायचे आहेत.
  • यात हॉटेल आणि रेस्टॉरंटचा समावेश आहे.

मेट्रो ९ दहिसर-मीरा भाईंदर

  • ११ किलो मीटरची ८ स्थानके असलेली मेट्रो-७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) पर्यंत विस्तारित आहे. 
  • २ टप्प्यात बांधली जात आहे. 
  • पहिला टप्पा ७ असून, १६.५ किमीचा आहे.  
  • दुसरा टप्पा हा २ भागांमध्ये आहे. 
  • सीएसएमआयए विमानतळ अंधेरी पूर्व (ज्याला मेट्रो ७-अ म्हणतात) सुमारे ३.५ किमी (२ स्थानकांचा समावेश आहे) पुढे दहिसर ते पुढील मीरा भाईंदर (मेट्रो-९) ९ आणि ७ अ या दोन्हीचे काम सुरु आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या