मागाठाणे परिसरातील रहिवाशांनो, १ जुलैला घ्या विशेष काळजी!

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • इन्फ्रा

मेट्रो-७ च्या कामांतर्गत पश्चिम द्रुतगती मार्गावरील मागाठाणे परिसरात आर इन्फ्रातर्फे चार मोनोपोल टाॅवर उभारण्यात आले आहेत. या टाॅवरद्वारे २२० केव्ही क्षमतेचा विद्युत प्रवाह १ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे १ जुलैला या परिसरातील रहिवाशांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) नं सावधानतेचा इशारा दिला आहे.

म्हणून नागरिकांनो घ्या काळजी

विद्युत प्रवाह सुरू होण्याच्या दिवशी या परिसरात कोणत्याही प्रकारचं बांधकाम, वृक्षारोपण वा इतर उपक्रम करू नयेत, अशा सूचना एमएमआरडीएकडून देण्यात आल्या आहेत. तर या दिवशी नागरिकांना विशेष काळजी घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

पश्चिम द्रुतगती मार्गाच्या पश्चिमेकडील २२० केव्ही क्षमतेचं उच्च दाबाचं विद्युत टाॅवर क्रमांक ७१ ते ७७ पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेकडे एपी-०२-०३-०४ आणि ०५ इथं स्थलांतरीत करण्यात आलं आहे.

एमएमआरडीएचा नागरिकांना इशारा

मेट्रो-७ च्या कामासाठी या टाॅवरचं स्थलांतर करण्यात आलं आहे. या टाॅवरमधून उच्च दाबानं २२० केव्ही क्षमतेचा विद्युत प्रवाह सुरू होणार असल्यानं अशावेळी विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. त्याअनुषंगानंच एमएमआरडीएनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या