वर्सोवा-विरार सी लिंक जपानच्या मदतीने पूर्ण होणार

जपान सरकार आणि त्यांच्या एजन्सी मुंबईतील वर्सोवा विरार सी लिंक (VVSL) प्रकल्पाला पाठिंबा देण्यास इच्छुक आहेत, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी, 24 ऑगस्ट रोजी जाहीर केले. 

फडणवीस हे पाच दिवसांच्या जपान दौऱ्यावर होते. चौथ्या दिवशी, त्यांनी टोकियो येथे जपानचे अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली. यावेळी आगामी वर्सोवा विरार सी लिंक (VVSL) प्रकल्पाभोवती चर्चा झाली.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL), मुंबई मेट्रो (लाइन 3), आणि बुलेट ट्रेन यासारख्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी आणि प्रकल्पांना गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सक्रिय दृष्टिकोनाबद्दल निशिमुरा यांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. त्यांनी या प्रकल्पांना भारताचे ‘ग्रोथ इंजिन’ असे संबोधले. व्हीव्हीएसएल प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य देण्याची जपानची तयारीही त्यांनी व्यक्त केली.

व्हीव्हीएसएल प्रकल्प मुंबईच्या पश्चिम किनार्‍यावर 43 किलोमीटरचा, आठ लेनचा उन्नत रस्ता तयार करेल. जो की वर्सोव्याला विरारशी जोडेल. या मेगा-प्रोजेक्टला यापूर्वीच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. त्याची अंदाजे किंमत 63,426 कोटी रुपये आहे.

जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) चे वरिष्ठ उपाध्यक्ष नाकाझावा केइचिरो, मित्सुबिशी इलेक्ट्रिकचे ग्रुप उपाध्यक्ष हिसाहिरो निशिमोटो आणि इशिकावा प्रीफेक्चरचे व्हाईस गव्हर्नर अत्सुको निशिगाकी यांचा समावेश होता.

शिवाय, नाकाझावा केइचिरो यांनी मुंबई पूर शमन प्रकल्पासाठी निधी देण्याची JICA ची तयारी जाहीर केली. यामुळे पुरामुळे होणारी जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान कमी होईल.


हेही वाचा

मुंबई मेट्रो 2 बी मार्गावर गर्डरचे यशस्वी बांधकाम

अंबरनाथ-बदलापूर-महापे दरम्यान मेट्रो 14 धावण्याची शक्यता

पुढील बातमी
इतर बातम्या