२ जूनला म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत

आचारसंहितेमुळे पुढे ढकलावी लागलेली मुंबई म्हाडाच्या घरांची सोडत २ जूनला निघणार आहे. मुंबईत म्हाडाने २१७ घरांच्या विक्रीसाठी मार्चमध्ये जाहिरात काढली होती. या घरांसाठी तब्बल ६६,०७८ अर्ज आले आहेत. 

पवई, चेंबूरमध्ये घरं

२१७ घरांमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी (एमआयजी) ४७, तर इतर १७० घरं कमी उत्पन्न गटासाठी आहेत. या एकूण २१७ घरांपैकी ४६ घरं पवईमध्ये आहेत. तर इतर घरं चेंबूरमध्ये सहकार नगरमधील शेल टाॅवरमध्ये आहेत. या घरांसाठी म्हाडाने मार्चमध्ये जाहिरात काढली होती. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे सोडत पुढे ढकलण्यात आली.

आता आचारसंहिता संपल्याने २ जूनला सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. डिसेंबर २०१८ मध्ये म्हाडाच्या लाॅटरीच्या माध्यमातून १३८४ घरं वितरीत केली होती. यातील ९८९ घरं अत्यल्प उत्पन्न गटासाठी होती. तर २१० घरं  मध्यम उत्पन्न गटासाठी होती. 


हेही वाचा -

मुंबईतील ६ मेट्रो मार्गिकांचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार


पुढील बातमी
इतर बातम्या