मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवासाचा वेळ 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार

File Photo
File Photo

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासाचा कालावधी २० ते २५ मिनिटांनी कमी केला आहे. खोपोली – कुसगावदरम्यान नव्या मार्गिकेचे (मिसिंग लेन) बांधकाम हाती घेतले आहे. हे काम ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे.

डिसेंबर २०२२ अखेरीस मार्गिकेचे काम पूर्ण होईल आणि जानेवारी २०२४ पासून ही नवीन मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होईल, असा दावा ‘एमएसआरडीसी’कडून करण्यात आला.

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गामुळे प्रवास वेगवान झाला आहे, मात्र त्याचवेळी या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर ‘एमएसआरडीसी’ने अपघात रोखण्यासाठी, तसेच प्रवास आणखी वेगवान करण्यासाठी खोपोली – कुसगावदरम्यान नवीन मार्गिका (मिसिंग लेन) बांधण्याचा निर्णय घेतला. या १९.८० किमी लांबीच्या नव्या मार्गिकेच्या (मिसिंग लेन) कामाला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली.

हा रस्ता २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, करोना आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे काम पूर्ण होण्यास उशीर झाला. आता हा नवा रस्ता २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याची माहिती 'एमएसआरडीसी'तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

या रस्त्याचे काम ६५% पूर्ण झालं आहे. तसेच दोन बोगद्यांचे काम ८०% पूर्ण झालं आहे. यापैकी एक बोगदा १.७५ किमी लांबीचा, तर दुसरा ८.९२ किमी लांबीचा आहे.


हेही वाचा

दहिसर आणि मालाडमध्ये पालिकेचे दोन जलतरण तलाव खुले

डोंबिवलीहून २० मिनिटांत ठाणे गाठा, मेपर्यंत पूल खुला होणार

पुढील बातमी
इतर बातम्या