परदेशी तरुणांनी मुंबईत महिलांसाठी बांधले शौचालय

मुंबई सेंट्रल - परदेशात राहणाऱ्या नागरिकांनी मुंबई सेंट्रल स्थानक परिसरात शौचालय बांधण्याचे काम हाती घेतले आहे. बॅक इन रिन या संस्थेतर्फे या शौचालयाचे बांधकाम हाती घेण्यात आलं. नॉर्वेत राहणाऱ्या तरुण-तरुणीने शौचालय बांधण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. महिलांसाठी शौचालय बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. पण आता या शौचालयाचे पुढचे काम या संस्थेने पालिकेकडे सुपूर्द केले आहे. मुबंई सेट्रल स्थानकानजीकच्या स्वच्छतागृहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या तरुणांच्या अनोख्या उपक्रमाची दखल घेत शिवसेनेने या तरुणांना भगवद्गीता भेट दिली आहे. हे स्वच्छतागृह एप्रिल महिन्यात महिल्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या