114 बिल्डरांना एसआरएचा दणका

मुंबई - दहा वर्ष झाली तरी झोपू योजनेचे काम सुरू न करणाऱ्या 114 बिल्डरांना एआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी दणका दिलाय. सुविधा डेव्हलपर्स, लकडावाला डेव्हलपर्स, आकृती निर्माण लिमिटेड, बाँम्बे स्लम रिडेव्हलपमेंट या विल्डरांना नोटीस पाठवण्यात आलीय. दहा वर्ष झाली तरी काम का सुरू झालं नाही? याची कारणं पंधरा दिवसात द्या, अशी नोटीसच पाटील यांनी बिल्डरांना पाठवली, अशी माहिती एसआरएतील सुत्रांनी दिलीय.

आतापर्यंत एसआरएनं 1,512 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. याद्वारे आतापर्यंत लाखो झोपूवासियांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालंय. मात्र त्याचवेळी मान्यता मिळालेल्या प्रकल्पांतील काही बिल्डरांनी दहा वर्षे झाली तरी काम सुरूच केलेले नसल्यानं झोपडपट्टीवासी रस्त्यावर आलेत. त्यामुळे आता एसआरअनं या बिल्डरांनाच दणका दिलाय. एसआरएनं पाठवलेल्या नोटीसनुसार बिल्डरांनी झोपूवासियांची फसणवूक केल्याचं स्पष्ट झाल्यास त्या बिल्डरांकडून प्रकल्प काढून घेण्यात येणाराय.

पुढील बातमी
इतर बातम्या