ओशिवरा पुल पुन्हा वाहतुकिसाठी खुला

(File Image)
(File Image)

बुधवारी, १० नोव्हेंबर रोजी, जवळपास ४ महिन्यांनंतर, ओशिवरा पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यावर्षी १७ ते १८ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरातील पूल बंद करण्यात आला होता.

याच दिवशी विक्रोळी, माहुल इथं दोन ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली होती. जुलैमध्ये झालेल्या पावसानं डांबरी पृष्ठभाग वाहून गेला आणि काँक्रीटचा स्लॅब उघडा पडला. त्याची दुरुस्ती करावी लागली, असं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पुलाचे मुख्य अभियंता सतीस ठोसर यांनी सांगितलं की, ते संपूर्ण पुलाची रुंदी वाढवण्याचे काम करत आहेत. सध्या ते फक्त हलक्या गाड्यांनाच पुलाचा वापर करू देत आहेत.

पूल बंद करण्यात आला होता, त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत होती. कारण पर्यायी मार्ग म्हणून एकच लेन खुली होती, असे स्थानिकांनी सांगितले.

गोरेगावचे नगरसेवक दीपक ठाकूर म्हणाले की, पूल लवकरात लवकर खुला व्हावा यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठका घेतल्या.

हा पूल एस व्ही रोड आणि राम मंदिराच्या जंक्शनमध्ये आहे. गोरेगावमध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी हा पूल महत्त्वाचा कनेक्टर आहे. लोखंडवाला, ओशिवरा इथून मालाड, कांदिवलीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वाहनचालकांसाठीही हा एक महत्त्वाचा पूल आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या