मुंबई - आरे कारशेड, झाडांची कत्तल, झाडांचे पुनर्रोपन, कामाचा आवाज, पुनर्वसन-विस्थापन अशा एक ना अनेक अडचणींचे ग्रहण मेट्रो-3 अर्थात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गाला लागले आहे.
वडाळ्यातील चार आणि आरेतील दोन अशा सहा कास्टींग यार्डमध्ये टनेल रिंगचे सेगमेन्ट बनवण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. 33.5 किमीच्या मार्गासाठी असे 40 हजार टनेल रिंग सेगमेन्ट बनवण्यात येणार आहेत. एकीकडे बांधकामाचे काम जोरात सुरू असताना दुसरीकडे एमएमआरसीने रोलिंग स्टॉक अर्थात मेट्रो गाड्या आणण्याच्या प्रक्रियेलाही वेग दिला आहे. महिलांच्या सुरक्षितेसाठी मेट्रोमध्ये विशेष भर देण्यात येणार असल्याचे अश्विनी भिडे यांनी यावेळी सांगितले.