दिवाळीत धमाकेदार ऑफर

मुंबई - दिवाळीनिमित्त मोठमोठ्या कंपन्यांची ऑफलाइन आणि ऑनलाइन कमाई जोरात असते. कंपनीतर्फे ग्राहकांसाठी काही ना काही ऑफर दिलेल्या असतात. त्यामुळे ग्राहक ऑफलाइन आणि ऑनलाइन खरेदी करायला अधिक प्राधान्य देतात. 3 हजार 500 रुपयाच्या खरेदीवर रिलायन्स ट्रेडतर्फे 1000 रूपयाचं गिफ्ट व्हाऊचर दिलं जातंय. तर बिगबाजारमध्ये एकावर एक फ्री अशी ऑफर ठेवलीय. दागिन्यांच्या खरेदीवरही मोठी सूट देण्यात आलीय. ऑनलाइन शॉपिंग साइट्स अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, शॉपक्लू या साइट्सवरही 30 ते 60 टक्के सूट देण्यात आलीय. त्यामुळे अशा धामकेदार ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित केलं जातंय.

पुढील बातमी
इतर बातम्या