नवरात्र आणि चंडीपाठ

मुंबई - भारतीय परंपरेत नवरात्रीत चंडीपाठला विशेष महत्त्व आहे. शक्तीची उपासना आणि नवरात्री हे परस्परांशी एकरूप आहे. विजय आणि शक्ती मिळवण्यासाठी देवीची उपासना आणि चंडीपाठचे महत्त्व हे धार्मिक आणि एेतिहासिक कथांमधून कथन करण्यात आले आहे. भारतीय मान्यतेनुसार विजयाचे सूत्र मिळवण्यासाठी श्री रामांनीदेखील देवीची प्रार्थना केली होती. असे म्हटले जाते की श्री रामचंद्रांनी शारदीय नवरात्रीच्या प्रतिपदेला समुद्र तटावर चंडीपाठाचे पठण केले होते. त्यानंतर तृतीयेपासून युद्धाची सुरुवात झाली. त्यानंतर दशमीला दशानन रावणाच्या कोटी सैन्याला पराभूत करत श्रीरामांनी विजय प्राप्त केला. चंडीपाठ हे प्राचीन वैज्ञानिक ग्रंथ मार्कंडेय पुराणातले 700 श्लोक आहेत. यांची रचना सूत्रांप्रमाणे करण्यात आली आहे. याच्या ध्वनीमुळे व्यक्तीची अांतरिक आणि मानसिक शक्तीच्या विस्ताराची क्षमता वाढते. चंडीपाठ म्हणजेच 700 श्लोक अर्गला, कीलक, प्रधानिकम रहस्यम, वैकृतिकम रहस्यम आणि मूर्तिरहस्यम या सहा आवरणांनी बांधलेले आहे. या श्लोकांच्या रचनेत ऋषी, देवता, बीज, शक्ती, महाविद्या, गुण, ज्ञानेंद्रिय, रस, कर्मेंद्रिय स्वर, तत्व, कला, उत्कीलन आणि मुद्रा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. अशी धारणा आहे की ठराव आणि विश्वासाने या श्लोकांचे पठण केल्यास व्यक्तीचा आत्मविश्वास आणि आंतरिक शक्तीची कुवत वाढते. आंतरिक शक्ती वाढवण्यासाठी या श्लोकाला भारतीय परंपरेत विशेष महत्त्व असून चंडीपाठामुळे व्यक्तीमध्ये दैवी उर्जेचा विस्तार होतो.

पुढील बातमी
इतर बातम्या