शिल्पकलेचे प्रदर्शन

नेहरुसेंटर- वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये संताजी चौगुले, तृप्ती दहिबावकर, सत्यजीत वरेकर या तीन कलाकारांच्या चित्र आणि शिल्पकलेचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. यामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारीत चित्रे लावण्यात आली आहेत. यामध्ये वरेकरांच्या 36 चित्रांचा समावेश आहे. त्या चित्रांच्या किंमती 9 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहेत.तर तृप्ती दहिबावकर यांच्या काही शिल्पांचा समावेश आहे. यामध्ये मोराच्या आकारात असलेली शिल्पं विशेष आकर्षक आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या मानवी आकृतींचाही समावेश आहे. या वेगवेगळ्या आकर्षक शिल्पांच्या किंमती 12 हजारांपासून दीड लाखापर्यंत आहेत. हे प्रदर्शन 17 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत खुलं असणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या