वाचाल तर वाचाल

प्रभादेवी - पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलंय. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय.15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत प्रदर्शनाचं आयोजन केलं य. मराठी भाषा विभाग मंत्रालय, मुंबई आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांच्या वतीनं प्रदर्शन भरवलंय. या प्रदर्शनात मुंबई आणि पुण्यातल्या नामांकित प्रकाशन संस्थांचा सहभाग आहे. तसंच वाचकांच्या आवडीस पात्र ठरलेले साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. 15 वेगवेगळी प्रकाशने, हजारो पुस्तके, ग्रंथ, कादंबरी यांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी प्रदर्शनाला साधारण 500 हून अधिक रसिकांनी भेट दिली. 

पुढील बातमी
इतर बातम्या