कालाघोडा फेस्टिव्हलमध्ये एसएनडीएची झलक

मुंबई - 17 व्या कालाघोडा फेस्टिव्हलची सांगता रविवारी झाली. शेवटच्या दिवशी एसएनडीए (सुमित नागदेव डांस आर्ट) ची खास झलक पाहायला मिळाली. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत संघर्ष करणाऱ्या महिलांना हा शो समर्पित करण्यात आला. तृष्णा या नावाने हा शो सादर करण्यात आला. एसएनडीएचे यंदा या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचे 10 वे वर्ष होते. 10 वर्षांपासून दरवर्षी कालाघोडामध्ये एसएनडीए आपली झलक दाखवते. यावेळी कलाकार नीरज लोहानी, श्रद्धा लव्हाटे आणि किरण शेंडे यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. या कार्यक्रमाला संगीत संचित म्हात्रे आणि जयंत यांनी दिले.

पुढील बातमी
इतर बातम्या