उद्यानाचं उद् घाटन करणार राज ठाकरे

मुलुंड - गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या चिंतामणराव देशमुख उद्यानाचं काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका सुजाता पाठक यांनी दिलेल्या निधीतून याचा खर्च केला गेलाय. या उद्यानात अनेक नवे बदल करण्यात आले आहेत.

गुरुवारी म्हणजे 29 डिसेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते याचं उद् घाटन करण्यात येणार आहे. "मुलुंडला उद्यानांचं नगर म्हणून ओळखलं जातं. तीच ओळख यानंतरही कायम टिकून राहिली पाहिजे," असं मत मनसे नगरसेविका सुजाता पाठक यांनी व्यक्त केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या