बदलत्या काळानुसार फॅशनची व्याख्याही बदलली आहे. मराठमोळा गणेशोत्सवही त्याला अपवाद राहिलेला नाही. गणेशोत्सवासाठीही आता खास कपडे येऊ लागलेत. गणपतीचे फोटो असलेले टी शर्ट यंदाच्या गणेशोत्सवात गणेश भक्तांसाठी खास आकर्षण ठरत आहेत.