हल्ली लहान वयात केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याची अनेक वेगवेगळी कारणंही असू शकतात. यामुळे लहान वयातच मुलं-मुली केस काळे करण्यासाठी मेहंदी आणि हेअर डाय किंवा कलरचा पर्याय निवडतात. पण जर जेवणात योग्य आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असेल तर काळे केस पांढरे होण्यापासून वाचवू शकतो.
पांढऱ्या केसांना काळे केस करायला कोणता आहार घ्यायला हवा आणि कोणते नैसर्गिक उपाय केले पाहिजेत हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा
आवळा
आवळा आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतो. आवळ्याचं फक्त सेवनच करू नका तर आवळा मेहेंदीमध्ये मिसळून केसांना कंडिशनिंग केलं तर ते केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. आवळा बारीक चिरुन गरम खोबऱ्याच्या तेलात मिसळून केसाला लावल्यास फायदा होईल. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात. आवळ्याचा मुरब्बा किंवा लोणचं खावं किंवा आवळ्याच्या तेलाने केसांची मालिश केल्यास फायदा होईल.
कांदा
कांदा तुमच्या पांढऱ्या केसांना काळं करण्यासाठी मदत करतो. केस धुण्याआधी केसांना कांद्याची पेस्ट लावून ठेवा, थोड्या वेळानंतर केस धुवा. तुम्ही नियमित काही दिवस असं केल्यास केस काळे होतील. शिवाय, केसं चमकदार होतील आणि केस गळतीसुद्धा थांबेल.
तूप
तुपाने केसांची मालिश केल्यास त्वचेला पोषण मिळतं. दररोज तुपाने डोक्याची मालिश केल्याने केसांना पांढरं होण्यापासून वाचवता येऊ शकतं.
कडीपत्ता
आंघोळीच्या पाण्यात तासभराआधी थोडी कडीपत्त्याची पानं टाका आणि नंतरच, त्या पाण्याने केस धुवा. कडीपत्त्याला बारीक कापून गरम खोबऱ्याचं तेल मिसळून केसाला लावल्यास केस पांढरे होणे थांबतील. तसंच, यामध्ये आयर्न आणि फॉलिक अॅसिडचं प्रमाण असतं. आहारात याचं प्रमाण वाढवल्यास पांढरे केस लवकर काळे होऊ लागतील.
चीज-पनीर
यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, व्हिटॅमिन बी आणि कॅल्शिअम असतं. आहारात यांचं प्रमाण वाढवल्यास केस काळे आणि दाट होतील.
दही
पांढरे होणारे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी दहीचा वापर करा. यासाठी हिना आणि दही समान प्रमाणात मिसळून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट केसांना लावा. हा घरगुती उपाय आठवड्यातून दोन वेळा केल्यास केस काळे होण्यास मदत होईल.
दहीमध्ये प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन बी १२ असते. दररोज, एक वाटी दही खावं किंवा आठवड्यातून एकदा दह्यामध्ये मीठ टाकून केसांची मालिश करावी.
भृंगराज आणि अश्वगंधा
भृंगराज आणि अश्वगंधा हे केसांसाठी वरदान मानलं जातं. याची पेस्ट खोबऱ्याच्या तेलात मिसळून केसांना लावून एक तासभर लावून ठेवा. मग, केस कोमट पाण्याने धुवून घ्या. यामुळे केसांची कंडिशनिंग होईल आणि पांढरे केस काळे होण्यास मदत होईल.
मेथीदाणे
यामध्ये आर्यन आणि फायबरचं प्रमाण असतं. रात्रभर मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी रिकाम्यापोटी हे पाणे प्यावे किंवा याने केस धुवावेत.
नारळ
यामध्ये व्हिटॅमिन इ कॉम्प्लेक्स, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडेंट्सचं प्रमाण असतं. दररोज, कच्चे नारळ खावे किंवा पाणी प्यावे. कोमट नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळून केसांची मालिश करावी.
हिरव्या पालेभाज्या
यामधून फॉलिक अॅसिड, आयर्न आणि व्हिटॅमिन ए चं प्रमाण असतं. ज्यामुळे केस काळे आणि मजबूत होतील.