ऐतिहासिक वैभवाने मुंबापुरी पुन्हा नटली

फोर्ट - मुंबईत असलेल्या प्राचीन वास्तू काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर होत्या. पण, काळा घोडा असोसिएशनच्या प्रयत्नांमुळे या वास्तूंना पूर्व स्वरुपात आणण्यात यश आलंय. दक्षिण मुंबईतल्या फोर्ट परिसरातलं हॉर्निमन सर्कल इथली पाणपोई, वाडीया क्लॉक टॉवर, ऑपेरा हाऊस थिएटर आणि काळा घोडा परिसरातील काळा घोडा पूर्वी सारखीच मुंबईची शान वाढवण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत. या पाणपोईची दुरुस्ती करण्यासाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च केले. तर, टॉवर क्लॉकसाठी एकूण 65 लाख रुपये एवढा खर्च करण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या