मुंबईत सात नवे जलतरण तलाव

मुंबई – मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा मुंबईकरांना खुश करण्यासाठी पालिकेकडून नवनव्या घोषणा केल्या जात आहेत. त्यात आता आणखी एका घोषणेची भर पडली आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शुक्रवारी परिमंडळीय आयुक्तांच्या बैठकीत मुंबई सात नवे जलतरण तलाव बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या जलतरण तलावांसाठी जागा निश्चित करत यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. सध्या मुंबईत पालिकेचे सात जलतरण तलाव असून, त्या आणखी सात जलतरण तलावांची भर पडणार आहे. मात्र सध्या जिथे जलतरण तलाव आहेत ते परिसर वगळत इतरत्र नवे जलतरण तलाव बांधण्यात येणार आहेत.

येथे असू शकतात नवे जलतरण तलाव

-लेडी लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग येथील प्रियदर्शनी पार्क

-वरळी हिल रिझव्हाँयर

-के पूर्व विभागातील पालिकेच्या अखत्यारीतील भूखंडावर

-पी उत्तर विभाग कार्यालयाजवळील चाचा नेहरू मैदानाच्या परिसरात

-देवनार गाव येथील मनोरंजन मैदानाच्या परिसरात

- टागोरनगर, राजर्षी शाहू क्रीडांगणाच्या परिसरात

- दहिसर पश्चिम आरटीओ कार्यालयाजवळील भूखंडावर

पुढील बातमी
इतर बातम्या