गोरेगावातल्या तरुणांसाठी ओपन जिम

गोरेगाव - बिंबिसारनगरच्या गणेश मैदान, वनराई कॉलनीमध्ये ओपन जिमचं शुक्रवारी उद् घाटन झालं. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्य हस्ते हे उद् घाटन करण्यात आलं.

काही वर्षांपासून परिसरातील तरुणांकडून जिमची मागणी सातत्यानं केली जात होती. त्यानुसार हे जिम तयार करण्यात आलंय, तसंच आणखी एक जिम मॉलमध्ये बांधणार असल्याचंही या वेळी वायकर यांनी सांगितलं. ही जिम तयार करण्यासाठी कृष्णा तटकरे यांनीही विशेष प्रयत्न केले.

पुढील बातमी
इतर बातम्या