वरळी - वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये चित्रकार मीना दुबे यांचं निसर्गचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या चित्र प्रदर्शनात 32 चित्रांचा समावेश आहे. 20 हजार रुपयांपासून 75 हजार रुपयांपर्यंतची चित्रं या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
निसर्ग हा विषय असल्यामुळे मीना यांच्या चित्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची निसर्गाची रुपं इथे पहायला मिळतात. भारतातल्या विविध भागात निसर्गाची असलेली विविध रुपं या चित्र प्रदर्शनात पहायला मिळतात. मीना दुबे यांचं हे सोलो प्रदर्शन आहे.