तुम्हाला बाईक रायडिंग करायला आवडते? त्यात तुमच्याकडे रॉयल एनफिल्डसारखी भारी बाईक आहे? मग तुम्हाला 'वन राईड' या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
वन राईड म्हणजे जगभरात बुलेटप्रेमींचा आनंदोत्सव...दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या रविवारी रॉयल इनफिल्ड वन राईड मोहीम राबवली जाते. त्यानुसार यावर्षी देखील मुंबई, नवी मुंबईसोबतच महाराष्ट्र, दिल्ली आणि अनेक शहरांमध्ये 'वन वर्ल्ड, वन राईड' ही मोहीम राबवली जात आहे. #RideAsOne या हॅशटॅग अंतर्गत या मोहिमेचा प्रचार केला जात आहे.
गेल्या सहा-सात वर्षांपासून एप्रिल महिन्याच्या पहिल्या रविवारी रॉयल एनफिल्ड वन राईड डे साजरा केला जातो. १५ देशांमधल्या १८० हून अधिक शहरांमध्ये जवळपास ३०० राईड्स या दिवशी आयोजित केल्या जातात. पण अट एवढीच आहे की ज्यांच्याकडे रॉयल एनफिल्ड आहे, तेच या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. यासाठी तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे. रॉयल एनफिल्डच्या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही यासाठी नोंदणी करू शकता. याशिवाय त्यांच्या फेसबुक पेजला देखील तुम्ही भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता.
मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाईक रायडर्स वन राईड मोहिमेत सहभागी होणार आहेत. मुंबईतल्या अनेक भागांमध्ये वन राईड मोहीम राबवली जाणार आहे.
ठाणे-विरार
घोडबंदर ब्रिज इथल्या वॉलटन हॉटेल जवळून सुरू होणारी राईड विरार फाटा इथल्या केटी रिसॉर्टजवळ संपेल. ८ एप्रिल म्हणजे रविवारी सकाळी ८ वाजता वन राईड रॅलीला सुरुवात होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या फेसबुक पेजलाही भेट देऊ शकता.
वांद्रे-नेरूळ-लोणावळा
दुसरी राईड वांद्रे-नेरूळ-लोणावळा असेल. त्यानुसार मुंबईतल्या रायडर्सनी सकाळी ७.३० वाजता वांद्रेतल्या ब्रँड स्टोअरमध्ये एकत्र यायचं आहे. तर नवी मुंबईतल्या रायडर्सनी नेरूळ इथं एकत्र यायचं आहे. वांद्रे, नेरुळ, पनवेल, पुणे महामार्ग, खोपोली, खंडाळा घाट आणि लोणावळा असा रायडर्सचा मार्ग आहे. वांद्रे-नेरूळ-लोणावळा या राईडच्या अधिक माहितीसाठी 919867078865 या नंबरवर संपर्क साधा.
हेही वाचा