कमोडच्या फ्लशला दोन बटणं का असतात?

आजकाल बहुतांश घरात कमोड म्हणजेच वेस्टर्न स्टाईलची शौचालयं असतात. घरातच कशाला ऑफिस, हॉटेल्स किंवा मॉलमध्ये गेलात तरी तुम्हाला हेच चित्र पाहायला मिळतं. वेस्टर्न कमोडसोबत तुम्ही त्याचा फ्लश पाहिला आहे का? फ्लश करण्यासाठी दोन बटणं दिलेली असतात. पण अनेकांना माहितच नसतं की दोन बटणं म्हणजेच 'ड्युअल फ्लश' कशासाठी आहेत? आपल्यापैकी बहुतेकांना हेच वाटतं की वेस्टर्न स्टाईलच्या कमोडमध्ये अधिक पाणी वापरलं जातं. पण तसं नाही. अधिक पाणी वाया जाऊ नये म्हणूनच तर ती दोन बटणं दिली आहेत. नेमकं या दोन बटनांमुळे पाण्याची बचत कशी होते? ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

ड्युअल फ्लशची आयडिया कशी सुचली?

ड्युअल फ्लशची आयडिया अमेरिकेच्या डिझायनर विक्टर पापानेक यांची आहे. १९७६ साली आलेल्या त्यांच्या 'फॉर द रियल वर्ल्ड' या पुस्तकात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर १९८० साली ऑस्ट्रेलियानं ड्युअल फ्लश हे तंत्रज्ञान वापरलं. याच्या वापरामुळे ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत करण्यात आली. त्यानंतर सर्वच देशांनी या तंत्रज्ञानाचा वापर केला.

कशी होते पाण्याची बचत?

ड्युअल फ्लश टॉयलेटचा संबंध दोन वेगवेगळ्या बटणांशी आहे. त्यापैकी एक लहान आणि दुसरा मोठा फ्लश आहे. या दोन्ही बटनांचा वेगवेगळा एक्झिट वॉल्व असतो. तसंच पाण्याची लेव्हलही वेगळी असते. या दोन बटनांपैकी लहान बटणातून साडे तीन ते चार लीटर पाणी एकावेळी वापरलं जातं. तर मोठ्या बटणातून सात ते नऊ लीटर पाणी एकावेळी वापरलं जातं. लहान फ्लश हा लिक्विड वेस्टला फ्लश करतो. तर मोठा फ्लश सॉलिड वेस्टला फ्लश करतो.

आता तर तुम्हाला ड्युअल फ्लशच्या मागील नेमकं तंत्र नक्कीच कळलं असेल. त्यामुळे पुढच्या वेळी शौचालयात गेलात की या ड्युअल फ्लशचा वापर काळजीपूर्वक करा.


हेही वाचा

आयुष्यातील हे महत्त्वाचे फॅक्ट्स माहित आहेत का?


पुढील बातमी
इतर बातम्या