सिनेमाच्या कमाईतून उभं करणार नेत्र रुग्णालय, डाॅ. तात्याराव लहाने यांची जिद्द

प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारीत 'डॉ. तात्याराव लहाने एक अंगार' हा चित्रपट १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या कमाईतून औरंगाबाद आणि मुंबई येथे मोफत नेत्र रूग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली.

काय असेल सिनेमात?

डॉ. लहाने यांनी अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत आपलं शिक्षण पूर्ण केलं. घरची हालाखिची परिस्थिती असताना देखील त्यांनी चिकाटीने शिक्षण घेतलं. समाजात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. किडनीच्या आजाराने त्रस्त झाल्यावर आयुष्यातील शेवटचं वर्ष असं डॉक्टरांनी सांगितलं असताना देखील आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि आईने दिलेल्या एका किडनीच्या बळावर डॉ. लहाने यांनी आपलं आयुष्य गोरगरिबांसाठी वाहून घेतलं. डॉ. लहाने यांची जिदद्, संघर्ष, कष्ट आणि आयुष्यात घडलेल्या अनेक महत्त्वाच्या घटना या बायोपिक द्वारे आपल्या समोर येणार आहेत.

अवयवदानाचा संदेश

हा केवळ बायोपिक नसून तरूणांसाठी एक आदर्श ठरवा अशी इच्छा डॉ. लहाने यांची आहे. या चित्रपटातून समाजाला अवयव दानाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. तो सगळ्यांतपर्यंत पोहचावा हा मुख्य उद्देश या चित्रपटामागे आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद आणि मुंबई येथे मोफत नेत्र रूग्णालय उभारण्याचा मुख्य उद्देश आहे. जे.जे. रुग्णालयातून निवृत्त झाल्यानंतर याच रूग्णालयात आपण काम करणार असल्याचं लहाने यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा-

प्रियांका चोप्राचा तिसरा मराठी सिनेमा!

'हॉस्टेल डेज'मध्ये बघा ६ नवीन चेहरे


पुढील बातमी
इतर बातम्या