बघा, 'सविता दामोदर परांजपे'च्या प्रीमियरला कोण कोण आलं?

सविता दामोरदर परांजपे या सिनेमाचा प्रीमियर शो नुकताच अंधेरी येथील पीव्हीआर-सिटी माॅलमध्ये झाला. बाॅलिवुडस्टार जाॅन अब्राहमची मराठीतील पहिली निर्मिती असलेला हा सिनेमा कसा असेल, याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. या प्रीमियर शो ला सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट या सिनेमाच्या स्टारकास्ट सोबतच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

अभिनेता जाॅन अब्राहमची पहिली निर्मिती असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाच्या प्रीमियर सोहळ्याला बाॅलिवुडकरांनी गर्दी केली.

सलमान खानचा भाऊ अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक सोहल खानने उपस्थित राहून सिनेमाच्या टीमला दिल्या शुभेच्छा.

प्रार्थना बेहरेसोबत नीता शेट्टी यांनीही लुटला प्रीमियर शोचा आनंद.

सोनाली कुलकर्णीच्या मनातही होती ‘सविता दामोदर परांजपे’बाबतची उत्सुकता.

परमीत सेठीनेही अनुभवला ‘सवित दामोदर परांजपे’ सिनेमातील थरार.

गायक-संगीतकार-दिग्दर्शक-निर्माता अवधूत गुप्तेने सिनेमा पाहिल्यावर पार्श्वगायक स्वप्नील बांदोडकरसोबत पोझ दिली.


हेही वाचा-

Exclusive Video: 'बघा' ‘सविता दामोदर परांजपे’ सिनेमाचा 'थरारक' प्रवास !

सुबोधच्या ‘घाणेकर’ची नवी झलक


पुढील बातमी
इतर बातम्या