'बॉईज २’चं मस्तीदार गाणं लाँच

‘बॉईज’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या, ध्येर्या - ढुंग्या या जोडीने तरुणवर्गाला अक्षरशः खूळ लावलं आहे. ‘आम्ही लग्नाळू...’ असं म्हणत, यापूर्वी किशोरवयीन मुलांना आपल्या तालावर नाचवणारे हे दोघे आता, ‘गोटी सोडा आणि बाटली फोडा...’ म्हणत महाविद्यालयीन तरुणांना आपल्या मस्तीत सहभागी करून घेत आहेत.

कधी होणार प्रदर्शित?

विशाल देवरुखकर दिग्दर्शित बॉईज’च्या धम्माल सिक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेलं हे गाणं, सोशल नेट्वर्किंग साईटवर चंगलंच गाजत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्यातील युथफुल मस्ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. हा सिनेमा ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनयाचा डबल धमाका

कॉलेज तरुणांना वेड लावणारं हे गाणं अवधूत गुप्तेने लिहिलं असून, उडत्या चालीच्या या गाण्याला त्यानेच संगीतदेखील दिलं आहे. आदर्श शिंदे आणि रोहित राऊतने या गाण्याला आपल्या मस्तीभऱ्या आवाजानं रंग चढवला आहे. या गाण्याबरोबरच, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड या सिनेमातील प्रमुख कलाकारांच्या अभिनयाचा डबल धमाका पाहण्यासाठीदेखील त्यांचे चाहते उत्सुक झाले आहेत.

शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या या तिघांची गोष्ट सांगणाऱ्या ‘बॉईज २’चं दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केलं असून, ऋषिकेश कोळीने संवादलेखन केलं आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.


हेही वाचा -

रणवीर सिंगला मराठी शिकवणाऱ्या हृषिकेशला अशी सुचली ‘बॉईज २’ची गोष्ट

पुढील बातमी
इतर बातम्या