२७ सनदी अधिकाऱ्यांची बदली

राज्य शासनाने बुधवारी राज्यातील २७ सनदी अधिकाऱ्यांची बदली केली. यांत एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्याकडे वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची सूत्रे सोपविण्यात आली असून एमएमआरडीएचे नवे आयुक्त म्हणून आर. ए. राजीव यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तर सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय महासंचालक भूषण गगराणी यांची बढती मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ एप्रिल रोजी २५ सनदी अधिकाऱ्यांची बदली केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांची नावे आणि विभाग

  • यू. पी. एस. मदान- अतिरिक्त मुख्य सचिव, अर्थ विभाग
  • आर. ए. राजीव- आयुक्त, एमएमआरडीए
  • भूषण गगराणी- प्रधान सचिव, मुख्यमंत्री कार्यालय
  • लोकेश चंद्रा- संचालक, सिडको
  • संतोष कुमार- संचालक, एमएसएसआयडीसी
  • एम. एन. केरकेट्टा- सीईओ, खादी ग्रामउद्योग
  • एस. आर. दौंड- एसईओ, प्रधान सचिव (व्यय), सामान्य प्रशासन विभाग
  • राजीव कुमार मित्तल- सचिव, अर्थ विभाग
  • पी. वेलारासू- सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
  • पराग जैन- संचालक, एमएसटीसी
  • एम. शंकरनारायणन- संचालक, महापालिका प्रशासन विभाग
  • सुमंत भांगे- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मत्स्यविकास प्राधिकरण
  • विजय वाघमारे- एमएसआरडीसीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक
  • एस. डी. लाखे- संयुक्त सचिव, अर्थ विभाग, मंत्रालय
  • दीपेंद्रसिंह कुशवाह- मुख्य अधिकारी, मुंबई गृह क्षेत्र विकास मंडळ
  • बी. जी. पवार- जिल्हाधिकारी, जालना
  • डी. के. जगदाळे- मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी मंडळ
  • विरेंद्र सिंह- महापालिका आयुक्त, नागपूर
  • सुनील चव्हाण- जिल्हाधिकारी, रत्नागिरी
  • प्रदीप पी.- संचालक, माहिती तंत्रज्ञान विभाग
  • संजय यादव- अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे
  • सी. के. डांगे- महापालिका आयुक्त, जळगाव महापालिका
  • पी. शिवा शंकर- महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास प्राधिकरण, नाशिक
  • शंतनू गोयल- जिल्हाधिकारी, परभणी
  • विजय राठोड - मुख्य कार्यकारी अधिकारी, गडचिरोली जिल्हा परिषद
  • राहुल कर्डिले- अमरावतीचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि आयटीडीपी धारणीचे प्रकल्प अधिकारी
  • कैलाश पगारे- मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हा परिषद


हेही वाचा- 

मंत्रालयाच्या गेटसमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रचारकी डोस! औषधा-औषधांवर अवतरलं भाजप...


पुढील बातमी
इतर बातम्या