दिंडोशीत क्रीडांगणाचं लोकार्पण

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सत्ताकारण

म्हाडा कॉलनी - दिंडोशीतील म्हाडा कॉलनी येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या नावाने उभारलेल्या क्रीडांगणाच्या लोकार्पणाचा सोहळा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला.

वर्षाचे 365 दिवस फक्त शिवसेना कार्यरत असते. शिवसेना फक्त प्राथमिक गरजांकडेच लक्ष न देता सुपरस्पेशलिटी सुविधा देतेय. अजूनही 63 ते 70 उद्यानं आम्ही विकसित करत आहोत. हे काम फक्त निवडणुकीपुरतं नाही, तर वर्षभर काम करत आहोत. महापलिकेवर भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महापौर स्नेहल आंबेकर यांनी या वेळी व्यक्त केला. आम्ही कामाचा जोगवा घेऊन मतदारांकडे जाणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

या वेळी नगरसेविका मनीषा पाटील यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार गजानन कीर्तिकर, दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, नगरसेविका मनीषा सदाशिव पाटील आदीही उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या